केशव ऊर्फ बंडू गोरे हे भारतीय स्वातंत्र्यलढयातील लढाऊ क्रांतिकारक आणि महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे खंदे कार्यकर्ते. समाजातील मूलभूत गरजांची पूर्ती व्हावी, व्यक्ती म्हणून समाजातील सर्व स्तरांतील प्रत्येकाचा विकास व्हावा असे ते मानत. त्यांचा क्रीडा, कला, वक्तृत्व, साहित्य यांचा व्यासंग दांडगा होता. प्रबोधन, लोकसहभाग आणि प्रत्यक्ष कृती यावर त्यांचा भर असे. लोकशाही समाजवादावर त्यांची नितांत निष्ठा होती.

त्यांच्या अकाली निधनानंतर त्यांची स्मृती जागती ठेवण्यासाठी आणि त्यांना अभिप्रेत असणारे कार्य विविध प्रकारे चालू राहावे या उद्देशाने त्यांच्या काही जिवलग मित्रांनी १९५८ मध्ये केशव गोरे स्मारक ट्रस्टची स्थापना केली.
प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. मोबाईल - ९३२१० ९१३१३ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०२३