अभ्यासिका

केशव गोरे स्मारक ट्रस्टचे विश्वस्त आणि कार्यकर्ते झोपडपट्ट्या आणि इतर वस्त्या वेगवेगळ्या कामांसाठी पालथ्या घालत होते. घरं छोटी छोटी, त्यामुळे या वस्त्यांमधील मुले रस्त्यावर अभ्यास करीत असायची. चांगले शिक्षण घ्यायचे, तर भरपूर अभ्यास करायला हवा आणि भरपूर अभ्यास करायचा तर निवांतपणा हवा. त्यासाठी घरात जागा हवी. मात्र इथे नेमकी तिचीच टंचाई. केवळ या कारणामुळे या गरीब मुलांचे शिक्षण अडू नये, त्यांना अभ्यासावर लक्ष केंद्रित करता यावे, या उद्देशाने ट्रस्टने अभ्यासिका सुरू केली. दहावी-बारावी ते मेडिकल, इंजिनिअरिंग, सी.ए., एम.बी.ए. अशा वेगवेगळ्या शाखांचे विद्यार्थी येथे अभ्यासाला येतात.

मुख्य इमारत आणि तीन डोंगरी केंद्र अशा दोन्ही ठिकाणी सकाळी ८ ते रात्री १२ या वेळात या अभ्यासिका चालतात. दरवर्षी सरासरी १००० विद्यार्थी या अभ्यासिकांचा लाभ घेतात. या अभ्यासिकांसाठी विद्यार्थ्यांकडून माफक शुल्क घेतले जाते.

प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. मोबाईल - ९३२१० ९१३१३ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०२३