आपल्या रोजच्या अनेक व्यवहारांसाठी तसेच वारसा विवाद, बांधकाम व भाडेकरू समस्या, नागरिकत्वाचे अधिकार बजावण्यासाठी आवश्यक असलेले कायद्याचे ज्ञान मिळवायचे तर त्यासाठी सर्वसामान्यांना योग्य सल्लागार शोधणे, त्याच्या खर्चाची तरतूद करणे अशा दिव्यातून जावे लागते. ट्रस्टने बृहन्मुंबई जिल्हा उपनगर विधिसेवा प्राधिकरणाच्या सहकार्याने ६ फेब्रुवारी २००५ पासून मोफत कायदेविषयक सल्ला केंद्र सुरू केले आहे.
ट्रस्टच्या मुख्य इमारतीत हे सल्ला केंद्र शनिवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळात चालते. पहिला व तिसरा शनिवार रमाकांत यादव आणि दुसरा व चौथा शनिवार यु.अ.पाल हे वकील मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात. |