लोकशाही राज्यव्यवस्थेत लोकांना अधिकार असल्याचे म्हटले जात असले, तरी सरकारी लालफितीच्या कारभारामुळे लोकशाहीऐवजी नोकरशाही प्रबळ झाल्याचे दिसते. आपल्यासाठीच झालेल्या निर्णयांची आणि योजनांची माहिती नागरिकांना मिळावी, यासाठी लोकचळवळीच्या रेटयाने झालेल्या माहितीचा अधिकार या कायद्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळावा, या उद्देशाने हे केंद्र २००६ साली सुरू करण्यात आले.
केंद्राची वेळ दर शनिवार सकाळी १० ते १२ आहे. |