दिवंगत प्रा. सुहास गोळे हे इंग्रजीचे सुप्रसिद्ध व्याख्याते होते. त्यांचे यथोचित स्मारक व्हावे, या उद्देशाने जुलै २००५ पासून हे भाषा शिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. इंग्रजी भाषेचा अभ्यासक्रम या केंद्रामार्फत चालवला जातो. तसेच १० वी १२ वीच्या मुलांकरिता इंग्लिश संभाषणाचे वर्गही घेतले जातात. |