केशव गोरे स्मारक ट्रस्ट अंतर्गत इंटर एड या फ्रेंच स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने आर्थिक विकास प्रकल्प सन २००८ पासून कल्याण केंद्र या इमारतीत सुरू करण्यात आला. प्रेम नगर, तीन डोंगरी या विभागापासून या प्रकल्पाची सुरूवात झाली.
निम्नस्तरातील गरजवंत लघु उद्योजकांस कमी व्याजदरात प्राथमिक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून त्यांना आर्थिकदृष्टया स्वयंपूर्ण करणे, हा या प्रकल्पाचा उद्देश. बिगर व्यावसायिकांना आर्थिक प्रशिक्षण देऊन घरगुती खर्चावर नियंत्रण ठेऊन बचत करण्यासाठी या उद्योजकांना प्रेरित केले जाते. जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहचण्याच्या उद्देशाने फेब्रुऱारी २०१० पासून भगतसिंग नगर या विभागात दुसरी शाखा सुरू करण्यात आली आहे.
या प्रकल्पामध्ये कर्ज दिलेल्या उद्योजकांमध्ये भाजीविक्रेते, फळविक्रेते, रिक्षाचालक, मोची, पानाची गादी चालवणारे, मोबाईल दुरुस्ती करणारे, कपडे विक्रेता इत्यादी छोटे उद्योजक आहेत. |