ट्रस्टचे सभागृह हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणा-या संस्था आणि संघटनांच्या कार्यक्रमांचे एक हक्काचे ठिकाण आहे. लोकशाही समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरी, सर्वोदयी अशा विविध पुरोगामी विचारधारांच्या कार्यकर्त्यांना ट्रस्टचे सभागृह नेहमीच आपुलकीचे वाटत आले आहे. अन्य कार्यक्रमांसाठी ट्रस्टचे सभागृह सशुल्क उपलब्ध करून दिले जाते. |