ग्रंथालय

शिक्षण आणि प्रबोधन हे ट्रस्टचे उद्दिष्ट असल्याने १९५९ पासून ट्रस्टने ग्रंथालय सुरू केले. ट्रस्टच्या तीन डोंगरी येथील कल्याण केंद्रातही ग्रंथालय सुरू करण्यात आले आहे. या दोन्ही ग्रंथालयांना महाराष्ट्र सरकारची सार्वजनिक ग्रंथालय वर्गवारीखाली मान्यता असून त्यांत समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, न्याय-विधी, चरित्र-आत्मचरित्र, ललित वाङमय अशा प्रकारांतील मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतील पुस्तके उपलब्ध आहेत.

मराठी विश्वकोष, महात्मा गांधी यांच्या लिखाणाचे संकलित ८६ खंड, कॉ. लेनिन यांच्या लिखाणाचे संकलित ४५ खंड असे काही वैशिष्टयपूर्ण ग्रंथ त्यात उपलब्ध आहेत. दोन्ही ग्रंथालयामध्ये मिळून एकूण १२ हजारांच्यावर पुस्तके आहेत.

संदर्भ ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध असून ट्रस्टचे दिवंगत कार्यकर्ते साथी मुकुंद जोगळेकर व साथी माधव साठे यांनी परिश्रमपूर्वक तयार केलेला संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि सोलिएत युनियनमधील गोर्बाचोव प्रणीत परिवर्तन या विषयांवरील दस्तावेज ही या ग्रंथालयाची मोलाची ठेव आहे.

ट्रस्टची मुख्य इमारत आणि तीन डोंगरी या दोन्ही ठिकाणी मोफत वाचनालयाची सुविधा असून मराठी, हिंदी, इंग्रजी वर्तमानपत्रे, मासिके, नियतकालिके तेथे वाचायला मिळू शकतात.

ग्रंथालयाची वेळ मंगळवार ते शनिवार, दुपारी १२ ते रात्री ८ व रविवार सकाळी ८ ते दुपारी १

प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७२४१२३ फॅक्स – २८७२४१२३ - २८७९०८९१ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०१६