ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र सुविधा

सरकारी कार्यालयांमधून आपली कामे करून घेणे किती जिकिरीचे व वेळखाऊ असते, हे आपणा सर्वांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ नागरिकांसाठी ओळखपत्राची सोय सरकारने केली असली, तरी त्यासाठी तहसीलदार कचेरीत करावी लागणारी ये-जा, होणारी दिरंगाई व दगदग, भ्रष्ट कारभारामुळे होणारा मनस्ताप यांमुळे वयस्कर ज्येष्ठ नागरिक त्रस्त होतात. त्यांचा त्रास वाचावा या उद्देशाने फेब्रुवारी २००४ पासून बोरिवली तहसीलदार कार्यालयाच्या सहकार्याने ओळखपत्र देण्याची सुविधा ट्रस्टने सुरू केली आहे.

सोमवार ते शनिवार सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत ज्येष्ठ नागरिकच या योजनेचे काम पाहतात.

ज्येष्ठ नागरिक ओळखपत्रासाठी
रेशनकार्डाची झेराक्स प्रत
दोन पासपोर्ट साइझ फोटो
पॅन कार्डाची झेराक्स प्रत
पॅन कार्ड नसल्यास विजेच्या अथवा टेलिफोनच्या बिलांची झेराक्स प्रत
ही कागदपत्रे सादर करणे गरजेचे आहे.

प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७२४१२३ फॅक्स – २८७२४१२३ - २८७९०८९१ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०१६