- विविध उपक्रम
व्याख्यानमाला
 

दिवंगत केशव गोरे यांचा २ फेब्रुवारी हा स्मृतिदिन. या स्मृतिदिनी १९६६ पासून अव्याहतपणे विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात.

केशव गोरे स्मारक ट्रस्ट संदर्भ ग्रंथालयामार्फतही वेळोवेळी विविध विषयांवर व्याख्यानमाला आयोजित केल्या जातात.

प्रबोधनात्मक कामाला ट्रस्ट प्राधान्य देते. चालू घडामोडी, सद्य राजकीय, आर्थिक व सामाजिक स्थिती आदी विषयांवर आवश्यकतेनुसार मान्यवरांची व्याख्याने आयोजित करण्यात येतात.
   
कन्सर निदान शिबीर

इंडियन कॅन्सर सोसायटीच्या सहकार्याने २००० सालापासून दरवर्षी कॅन्सर निदान शिबीराचे आयोजन केले जाते.

   
अनंत न. साठे पुरस्कार
 

स्वातंत्र्यसैनिक श्री. अनंत साठे यांनी गोरेगाव परिसरातील सामाजिक कार्य करणा-या व्यक्तीस पुरस्कार देऊन गोरविण्यासाठी ट्रस्टकडे निधी सुपूर्द केला आहे. हा पुरस्कार १९९६ पासून दरवर्षी २ फेब्रुवारी रोजी केशव गोरे स्मृतिदिनी समारंभपूर्वक दिला जातो.

   
महाराष्ट्र फाऊंडेशन

महाराष्ट्र फाऊंडेशन ही अमेरिकेतील महाराष्ट्रीयांनी स्थापन केलेली संस्था. गेल्या १४ वर्षापासून साहित्य व सामाजिक क्षेत्रांत भरीव कार्य करणा-या महाराष्ट्रातील संस्था व व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरविण्याचे कार्य ही संस्था करते. पुरस्कार उपक्रमाच्या स्थापनेपासून २००८ सालापर्यंत केशव गोरे स्मारक ट्रस्टने या उपक्रमाची भारतातील कार्यवाहक संस्था म्हणून काम पाहिले. महाराष्ट्रातील दुर्गम भागांत तळमळीने कार्य करणा-या तसेच साहित्यात मोलाची भर टाकणा-या अनेक कार्यकर्ते व लेखक यांना पुरस्कार निवडीत सहभागी करून घेण्याचे कार्य ट्रस्टने केले आहे.

   
ट्रस्टची प्रकाशने
 
  • भारत राष्ट्रउभारणीची प्रक्रिया लेखक : तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी
  • लोकशाही समाजवाद - लेखक : पन्नालाल सुराणा
  • शिक्षण, समाजपरिवर्तन व राष्ट्रीय विकास - लेखक : डा. जनार्दन वाघमारे
  • मुस्लिम मराठी साहित्य संमेलन १९९० - लेखक : फ.म.शहजिंदे
  • अणुयुगातील मानवधर्म लेखक : प्रा. दि.के.बेडेकर
  • शेतकरी ग्राहक आणि महागाईचे त्रैराशिक (मनोविकास प्रकाशन) – लेखक : महेश सरलष्कर
   
सभागृह
 

ट्रस्टचे सभागृह हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणा-या संस्था आणि संघटनांच्या कार्यक्रमांचे एक हक्काचे ठिकाण आहे. लोकशाही समाजवादी, मार्क्सवादी, आंबेडकरी, सर्वोदयी अशा विविध पुरोगामी विचारधारांच्या कार्यकर्त्यांना ट्रस्टचे सभागृह नेहमीच आपुलकीचे वाटत आले आहे. अन्य कार्यक्रमांसाठी ट्रस्टचे सभागृह सशुल्क उपलब्ध करून दिले जाते.

प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. मोबाईल - ९३२१० ९१३१३ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०१६