बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार

सार्वजनिक संसाधनांचा उपयोग समाजाच्या तळागाळातील लोकांसाठी झाला पाहिजे असा आग्रह असणारे, त्यासाठी जनहित याचिकेचे हत्यार सर्व प्रथम उपयोगात आणणारे प.बा.ऊर्फ बाबुराव सामंत यांच्या स्मृतीला सलाम करण्यासाठी २०१० सालापासून बाबुराव (प.बा.) सामंत संघर्ष पुरस्कार देण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे.

प्रथम पुरस्कार औरंगाबादचे संघर्षशील कार्यकर्ते श्री. चेतन कांबळे यांना देण्यात आला आहे. अनधिकृत दारू दुकाने, धान्यापासून दारू निर्मिती प्रकल्प, पेट्रोलपंप वाटपातील घोटाळा आदी प्रकरणे त्यांनी न्यायालयात दाद मागून चव्हाटयावर आणली. माहितीचा अधिकार आणि जनहित याचिकाद्वारे त्यांची लढत सुरू आहे.

मानचिन्ह व रु. पन्नास हजार (रोख) असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

प्रमुख केंद्र – केशव गोरे स्मारक ट्रस्ट, स्मृति, आरे रोड, गोरेगाव (प.), मुंबई – ४०० ०६२. मोबाईल - ९३२१० ९१३१३ इमेल – kgstmtnl@gmail.com
उपकेंद्र - केशव गोरे स्मारक ट्रस्ट, कल्याण केंद्र, सुभाष नगर, ए वन बेकरीजवळ, तीन डोंगरी (प.), मुंबई – ४०० ०९०. दूरध्वनी क्रमांक – (०२२)२८७८७३८६
 
© सर्व अधिकार राखिव २०१६